Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेची सांगता ३ जून रोजी झाली. या स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले.
या विजेतेपदानंतर या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
यावेळी ज्या खेळाडूंना पुरस्कार प्राप्त झाले, त्यांना त्यांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यात १४ वर्षांच्या वैभव सुर्यवंशीला हंगामातील सर्वोत्तम सुपर स्ट्रायकर पुरस्कार मिळाला.
त्याने २०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्याने त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.
त्याबद्दल त्याला टाटा कर्व्ह कार बक्षीस म्हणून मिळाली आहे. ही कार सामन्यांदरम्यान बाऊंड्री लाईनबाहेर दिसली आहे.
मात्र असे असले तरी अद्याप वैभव १४ वर्षांचाच असल्याने त्याला ही कार चालवण्यासाठी लायसन्स मिळणार नाही.
वैभवने ७ सामने खेळले असून २०६.५५ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या आहेत.