IPL: पहिल्या 8 सामन्यांत 7 विजय मिळण्याचा पराक्रम या 5 संघांनी केलाय

प्रणाली कोद्रे

राजस्थान रॉयल्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेतील 38 व्या सामन्यात सोमवारी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला.

RR vs MI | IPL 2024 | X/IPL

राजस्थान रॉयल्सचा 7 वा विजय

हा राजस्थान रॉयल्सचा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील आठ सामन्यांतील सातवा विजय आहे.

Sandeep Sharma - Sanju Samson | Rajasthan Royals | X/rajasthanroyals

पाचवा संघ

त्यामुळे राजस्थान एका आयपीएल हंगामातील पहिल्या आठ सामन्यांमध्येच सात विजय मिळवणारा एकूण पाचवा संघ ठरला आहे.

Yashasvi Jaiswal - Sanju Samson | X/IPL

मुंबई इंडियन्स

असा विक्रम सर्वात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सने केला होता. त्यांनी 2010 मध्ये पहिल्या आठ सामन्यांत सात विजय मिळवले होते.

Mumbai Indians | X/MIPaltan

पंजाब किंग्स

त्यानंतर असा पराक्रम पंजाब किंग्सने केला. पंजाबे 2014 साली पहिल्या आठ सामन्यांत सात विजय मिळवले होते.

Punjab Kings | X

चेन्नई सुपर किंग्स

यानंतर साल 2019 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने हा विक्रम केला. त्यांनीही त्यावर्षी हंगामातील पहिल्या आठ सामन्यांत सात विजय मिळवले होते.

Chennai Super Kings | X/ChennaiIPL

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्स संघाचेही नाव या यादीत असून त्यांनी 2022 च्या आयपीएलमध्ये पहिल्या आठ सामन्यांत सात विजय मिळवले होते.

Gujarat Titans | X/gujarat_titans

तिलक वर्माचा मोठा विक्रम, 'मिस्टर IPL'ला टाकलं मागे

Tilak Varma | X/MIPaltan