तिलक वर्माचा मोठा विक्रम, 'मिस्टर IPL'ला टाकलं मागे

प्रणाली कोद्रे

राजस्थान रॉयल्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेतील 38 व्या सामन्यात सोमवारी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला.

RR vs MI | IPL 2024 | X/IPL

तिलकचं अर्धशतक

असे असले तरी मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माने या सामन्यात अर्धशतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Tilak Varma | X/MIPaltan

तिलकच्या 1000 धावा

तिलकने 45 चेंडूत 65 धावा केल्या. यासह त्याने आयपीएलमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. तिलकने 33 व्या डावात आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या.

Tilak Varma | X/IPL

रैनाला टाकलं मागे

त्यामुळे सर्वात कमी डावात 1000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिलक मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला.

Tilak Varma | X/MIPaltan

पहिला क्रमांक

या विक्रमाच्या यादीत ऋतुराज गायकवाड आणि सचिन तेंडुलकर संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांनी 31 डावात 1000 आयपीएल धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

Sachin Tendulkar - Ruturaj Gaikwad | X/IPL

तिसरा क्रमांक

तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रैनाने 34 डावात 1000 आयपीएल धावा केल्या होत्या.

Suresh Raina | X/ChennaiIPL

चौथा क्रमांक

या विक्रमाच्या यादीत ऋषभ पंत आणि देवदत्त पडिक्कल संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 35 डावात 1000 आयपीएल धावा केल्या होत्या.

Rishabh Pant - Devdutt Padikkal | X/IPL

पाचवा क्रमांक

पाचव्या क्रमांकावर असलेल्या गौतम गंभीरने 36 डावात 1000 आयपीएल धावा केल्या होत्या.

Gautam Gambhir | X/IPL

धोनी-रोहितनंतर IPL मध्ये असा विक्रम करणारा कार्तिक तिसराच

Dinesh Karthik | Sakal