IPL मध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कोणी केलाय?

प्रणाली कोद्रे

राजस्थान रॉयल्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेत 31 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

Jos Buttler | X/IPL

राजस्थान रॉयल्सने केला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानसमोर 224 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने शेवटच्या चेंडूवर 8 विकेट्स गमावत पूर्ण केले.

Jos Buttler | Sakal

चार वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

त्यामुळे राजस्थानने आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या आपल्याच चार वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Riyan Parag | Sakal

राजस्थान रॉयल्स

आयपीएल 2020 मध्येही राजस्थानने पंजाब किंग्सविरुद्ध 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता.

Rahul Tewatia | X/IPL

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याच्या विक्रमात राजस्थानपाठोपाठ मुंबई इंडियन्स असून त्यांनी 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 219 धावांचे लक्ष्य गाठले होते.

Kieron Pollard | X/IPL

राजस्थान रॉयल्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स

यानंतर पुन्हा राजस्थान रॉयल्स संघ आहे. 2008 साली राजस्थानने डेक्कन चार्जर्सविरुद्ध 215 धावांचे लक्ष्य गाठले होते.

Rajasthan Royals | X

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

याशिवाय 2023 आयपीएलमध्ये मुंबई इंडयन्सने पंजाब किंग्सविरुद्धही 215 धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते.

Mumbai Indians | X/IPL

सनरायझर्स हैदराबाद

2023 आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्ध जयपूरला झालेल्या सामन्यात 215 धावांचेच लक्ष्य पूर्ण केले होते.

Abhishek Sharma | X/IPL

मुंबईविरुद्धच्या विजयानंतर CSKचे खेळाडू सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक

CSK players visit Siddhivinayak Temple | Sakal