Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत २९ मे रोजी क्वालिफायर १ सामन्यात रजत पाटिदारच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत केले.
क्वालिफायर १ सामन्यातील या विजयासह बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
त्यामुळे रजत पाटिदार बंगळुरूला अंतिम सामन्यात पोहचवणारा चौथा कर्णधार ठरला आहे.
यापूर्वी २००९ साली अनिल कुंबळेच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वात आधी आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचले होते. पण त्यावेळी डेक्कन चार्जर्सने त्यांना पराभूत केले.
साल २०११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू डॅनिएल विट्टोरीच्या नेतृत्वात आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचवले होते. पण त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांना पराभूत व्हावे लागले.
विराट कोहलीच्या नेतृत्वात २०१६ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचले होते. पण त्यावेळी सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला होता.
बंगळुरूला यापूर्वी तीनवेळा अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. पण आता रजत पाटिदारच्या नेतृत्वात बंगळुरूला विजेतेपदाची अपेक्षा आहे.