Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्सने संघात रिटेन दोन खेळाडूंमध्ये एक ३४ वर्षीय शशांक सिंह आहे.
त्यानेही या विश्वासाला जागून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा होत असून आता त्याच्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांनाही उत्सुकता आहे.
दरम्यान, शशांकने अद्याप लग्न केलेलं नाही. पण तो रिलेशनशीपमध्ये आहे.
शशांकला त्याचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडते, त्यामुळे तो त्याबद्दल फार कमी वेळा चर्चा करताना दिसला आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार शशांकच्या गर्लफ्रेंडचे नाव मेहक आहे. ते गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
मेहक स्टेडियममध्येही उपस्थित राहून शशांक आणि पंजाब किंग्सला प्रोत्साहन देताना दिसली आहे. तिने एका तिच्या पोस्टमध्ये शशांक तिचा आवडता खेळाडू असल्याचेही सांगितले होते.
काही दिवसांपूर्वी ती आर युजवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड जे महावश सोबतही स्टेडियममध्ये पंजाब किंग्सला पाठिंबा देताना दिसली होती.