राजगड किल्ला किती वर्ष जुना आहे?

Aarti Badade

तब्बल १,९५६ वर्षांचा राजगड!

पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगडाला मोठा इतिहास लाभला आहे. उपलब्ध माहितीनुसार, या गडाचे मूळ बांधकाम इसवी सन ७० च्या आसपास झाल्याचे सांगितले जाते.

rajgad fort age history

|

Sakal

‘मुरुंबदेवाचा डोंगर’ ते राजगड

सातवाहन काळात हा डोंगर ‘मुरुंबदेव’ म्हणून ओळखला जात होता. पुढे इ.स. १६४६ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचे ‘राजगड’ असे नामकरण केले.

rajgad fort age history

|

Sakal

स्वराज्याची पहिली राजधानी

महाराजांनी राजगडाची मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणी केली. सुमारे २६ वर्षे हा किल्ला स्वराज्याची राजधानी राहिला आणि अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार ठरला.

rajgad fort age history

|

Sakal

राजगडाशी जोडलेल्या ऐतिहासिक घटना

अफजलखानाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून प्रतापगडाकडे रवाना झाले. महाराणी सईबाईंचे निधन याच गडावर झाले, तर इ.स. १६७० मध्ये राजाराम महाराजांचा जन्मही राजगडावर झाला.

rajgad fort age history

|

Sakal

सुरतेची लूटही राजगडावर आणली

सुरतेच्या मोहिमेनंतर मिळालेली संपत्ती राजगडावर आणण्यात आली होती. इ.स. १६७१ मध्ये राजगडाच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करण्यात आला. पुढे १६८९ मध्ये गड मुघलांच्या ताब्यात गेला आणि काही वर्षांत पुन्हा स्वराज्यात आला.

rajgad fort age history

|

Sakal

पद्मावती माचीवर काय पाहाल?

पद्मावती तळे, पद्मावती मंदिर, सदर, पाण्याच्या टाक्या, अंबारखाना, दारू कोठार आणि विविध प्रवेशमार्गांचे अवशेष येथे पाहायला मिळतात.

rajgad fort age history

|

Sakal

सुवेळा आणि संजीवनी माचीची खासियत

सुवेळा माचीवर तटबंदी, झुंजार बुरूज, नेढ आणि हत्ती प्रस्तर पाहायला मिळतात. संजीवनी माचीची दुहेरी तटबंदी, बुरूज आणि ऐतिहासिक अवशेष विशेष आकर्षण ठरतात.

rajgad fort age history

|

Sakal

बालेकिल्ला आणि गडावर जाण्याचा मार्ग

बालेकिल्ल्यावर राजवाड्याचे अवशेष, देवीचे मंदिर, ब्रह्मर्षी मंदिर, सदर आणि चंद्रतळे पाहता येते. पुण्याहून वाजेघर, पाली, गुंजवणे किंवा भुतोंडे मार्गे राजगडाच्या पायथ्याशी पोहोचता येते.

rajgad fort age history

|

Sakal

हरिश्चंद्रगड किती वर्षे जुना आहे?

Harishchandragad | sakal
येथे क्लिक करा