घरीच बनवा मसालेदार ‘राजमा मसाला’; पाहा झटपट सोपी रेसिपी

Aarti Badade

भाज्या खाऊन कंटाळलेल्यांसाठी उत्तम पर्याय

जेवणात नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असल्यास संध्याकाळच्या बेतासाठी हॉटेल स्टाईल चमचमीत 'राजमा मसाला' हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे.

rajma masala recipe

|

Sakal

राजमा मसाला

या रेसिपीसाठी रात्रभर भिजवलेला राजमा, कांदा, टोमॅटो पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कसुरी मेथी, कोथिंबीर, तेल आणि चवीनुसार मीठ गोळा करा.

rajma masala recipe

|

Sakal

सुके मसाले

तसेच फोडणीसाठी जिरे, हिंग आणि भाजीला छान चव व रंग आणण्यासाठी हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आपल्या सोयीनुसार जवळ ठेवा.

rajma masala recipe

|

Sakal

कुकरमध्ये राजमा मऊ शिजवून घेणे

सर्वप्रथम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला राजमा स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी व थोडे मीठ घालून तो चांगला मऊ शिजवून घ्या.

rajma masala recipe

|

Sakal

कढईत कांदा आणि टोमॅटो प्युरीची फोडणी

कढईत तेल गरम करून त्यात जिरे व हिंग परता; नंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो पेस्ट आणि आलं-लसूण पेस्ट घालून मिश्रण मंद आचेवर तेल सुटेपर्यंत शिजवा.

rajma masala recipe

|

Sakal

शिजवलेला राजमा एकत्र करणे

आता या मऊ शिजलेल्या ग्रेव्हीत लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि हिरव्या मिरच्या घालून परता; नंतर त्यात शिजवलेला राजमा टाकून ५ ते ६ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.

rajma masala recipe

|

Sakal

चपाती किंवा जिरा राईससोबत आस्वाद घ्या

भाजी छान मिळून आल्यावर वरून कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा; हा चविष्ट राजमा मसाला गरमागरम चपाती, पराठा किंवा भातासोबत खाण्यासाठी तयार आहे.

rajma masala recipe

|

Sakal

वर्षभर टिकेल! असा बनवा कच्च्या कैरीचा पारंपरिक आंबट-गोड 'मुरांबा'!

Kairicha muramba recipe

|

Sakal

येथे क्लिक करा