कसं घडलं राजू शेट्टींचं नेतृत्व?

Ashok Jawale

शेतीची जबाबदारी

१९८५ मध्ये इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर वडिलांच्या निधनामुळे त्यांनी कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी सांभाळली; इथूनच त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंध आला.

शेतकरी संघटना

शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत काम करताना त्यांनी शिरोळ तालुक्यात संघटनात्मक बांधणी केली; १९९५ मध्ये ते तालुका अध्यक्ष झाले.

झोनबंदी आंदोलन

२००० मध्ये झोनबंदी धोरणाविरोधात आंदोलन उभारले; मिरजमधील संघटनेचे अधिवेशन यशस्वी केल्यानंतर त्यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

झेडपी सदस्य

२००१ मध्ये उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आले; शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यासपीठ मिळाले.

स्वाभिमानीची स्थापना

शरद जोशी यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे २००४ मध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली.

ऊसदर संघर्ष

२००५च्या गाळप हंगामात 'स्वाभिमानी'सह शेतकरी संघटनांनी पहिल्या हप्त्यासाठी प्रतिटन १,५०० रुपयांची मागणी केली; त्यावेळी वैधानिक किमान दर ८०० ते ८५० रुपये होता.

आमदारकीला विजय

२००४ मध्ये शिरोळमधून अपक्ष म्हणून निवडून आले; 'एक नोट, एक मत' मोहिमेत समर्थकांनी एक ते १०० रुपयांपर्यंतच्या देणग्यांतून प्रचारासाठी निधी उभारला.

संसद प्रवेश

२००९ मध्ये हातकणंगलेतून निवडून येत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता माने यांचा पराभव केला; २०१४ मध्ये पुन्हा विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले.

राजू शेट्टी अन् ऊसदर आंदोलन

येथे क्लिक करा