रणांगण अन् राजनीती...असं होतं संभाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व

Aarti Badade

संभाजीराजे

शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे 9 वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंच्या विरोधात लढत होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

संभाजीराजे आणि औरंगजेब

संभाजीराजे आणि मोगल फौजांच्या लढाईत, औरंगजेब सळो की पळो झाला. शेवटी त्याला पराभव स्वीकारावा लागला.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

राजनीती

संभाजीराजे केवळ रणांगणातच नाही, तर राजनीतीतदेखील निपुण होते. पोर्तुगीज आणि मोगलांविरुद्ध त्यांनी एकत्र रणनीती आखली.

रणनीती

पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी संभाजीराजांनी अरबांशी मैत्री केली, असे वा. सी. बेंद्रे नमूद करतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ही त्यांची राजनीती होती.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

प्रजेची काळजी

संभाजीराजे प्रजेची देखभाल करत होते, दुष्काळग्रस्तांना मदत, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि महिलांच्या अधिकारांची काळजी घेत होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj | sakal

स्त्री स्वातंत्र्य

आपल्या महाराणीला सर्वाधिकार देणारे संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. शिवरायांप्रमाणेच आपल्या राज्यातील आणि परराज्यातील महिलांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली.

chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

संस्कृत आणि साहित्य

संभाजीराजे संस्कृत, हिंदी, मराठी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी 'बुधभूषण', 'नखशिख', 'नायिकाभेद' आणि 'सातसतक' हे ग्रंथ लिहिले.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

धार्मिक द्वेष

संभाजीराजेंची मोगल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीजांच्या विरोधातील लढाई राजकीय होती. धार्मिक नव्हती. ते कधीही, कोणाशीही धार्मिक द्वेषाने वागले नाहीत.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

माहिती

सदर माहिती डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या सकाळ वृत्तसेवसाठीच्या लेखातून घेतली आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal

संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दल जाणून घ्या 'या' अनोखी गोष्टी

Sakal
येथे क्लिक करा.