सकाळ डिजिटल टीम
राखी सावंत आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.
आता तिने तिसऱ्या विवाहाच्या चर्चेतून पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
राखी सावंतचे नाव पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता डोडी खानसोबत जोडले जात आहे.
राखीने स्वतःच या चर्चेला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे आणि सांगितले आहे की ती पाकिस्तानची सून होण्याचा विचार करीत आहे.
राखी सध्या पाकिस्तानच्या लाहोर शहरात आहे, जिथे ती अभिनेत्री हानिया आमिरसोबत काही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.
हानिया आमिरसोबतच्या मस्तीमुळे राखी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.
राखी आता डोडी खानच्या विवाह प्रस्तावावर विचार करत आहे, ज्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गॉसिप जगतात धुमाकूळ माजला आहे.