Monika Shinde
राखी पौर्णिमा म्हणजे बंधनाचं, प्रेमाचं आणि आठवणींचं नातं. कमी बजेटमध्येही बहिणीसाठी खास गिफ्ट्स देऊन हा दिवस अविस्मरणीय बनवा
तुमच्या दोघांच्या जुन्या आठवणी असलेला फोटो एक सुंदर फ्रेममध्ये देऊ शकता. हा भावनिक आणि खास गिफ्ट तिला नक्की आवडेल.
घरच्या घरी बनवलेलं छोटंसं स्किनकेअर किट फेसपॅक, लिप बाम, स्क्रब. स्वस्तात आणि नैसर्गिक प्रेमाचं गिफ्ट!
तिच्या नावाचं किंवा पहिल्या अक्षराचा अल्फाबेट असलेलं ब्रेसलेट 150-200 मध्ये मिळतं. दररोज वापरता येईल असं ट्रेंडी गिफ्ट.
सुंदर कुंडीत मनी प्लांट, सुकुलेंट्ससारखा छोटा इनडोअर प्लांट बहिणीसाठी परफेक्ट गिफ्ट! निसर्गप्रेमींसाठी खास पर्याय.
सुगंधी मेणबत्त्या तिच्या रूमला दिलेल्या स्टाईलमध्ये शोभून दिसतील. रिलॅक्सेशनसाठी परफेक्ट आणि स्टायलिश गिफ्ट!
छानशी स्टायलिश इअरिंग्ज किंवा ब्रॅसलेट 100-200 मध्ये मिळू शकतात. कॉलेज किंवा ऑफिससाठी डेली वेअरला योग्य.
वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स एकत्र करून छोटा हॅम्पर तयार करा. स्वतः बनवलेलं हे गिफ्ट तिला नक्की आवडेल.
तिच्यासाठी लिहिलेलं छोटंसं पत्र आठवणी, आभार, आणि प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग. पैशांपेक्षा भावना महत्त्वाच्या असतात!