रक्षाबंधनला स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ 7 नेकलेस ट्राय कराच

Anushka Tapshalkar

रक्षाबंधन आणि स्टायलिश लूक

रक्षाबंधनाला एथनिक लूक करताना सुंदर सूटसोबत योग्य ज्वेलरी घालणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हलके, आरामदायी आणि स्टायलिश नेकलेस हवे असतील तर हे 7 डिझाइन्स नक्की ट्राय करा.

Raksha Bandhan Fashion Tips

|

sakal

कलरफुल स्टोन नेकलेस

सूटच्या लूकमध्ये थोडा रंग हवा असेल तर कलर स्टोन नेकलेस घाला. बेज, पांढरा, काळा किंवा फिकट रंगाच्या सूटसोबत हा नेकलेस खूप सुंदर दिसतो.

Colorful Stone Necklace

|

sakal

एलिगंट चोकर सेट

चोकर नेकलेस कॉलरबोनवर सुंदर दिसतो आणि नेकलाइनला उठाव देतो. झुमक्यांसोबत याची जोडी खास दिसते. V-नेक आणि राउंड-नेक कुर्त्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Choker Necklace

|

sakal

लीफ मोटिफ नेकलेस

पानांच्या डिझाइनचा हलका नेकलेस नाजूक आणि एलिगंट लूक देतो. त्याचा कर्व्ह शेप वेगवेगळ्या नेकलाइनसोबत छान दिसतो. मॅचिंग इअररिंग्स घातल्यास लूक आणखी खुलतो.

Leaf Motif Necklace

|

sakal

सिंपल पेंडंट

काय घालावं हे समजत नसेल तर साधा पेंडंट घाला. लाल, हिरवा, पिवळा, मरून अशा रंगांच्या सूटवर गोल्ड पेंडंट छान दिसतो, तर निळ्या किंवा इतर फिकट रंगांच्या सूटवर सिल्व्हर पेंडंट सुंदर दिसतो.

Simple Gold Pendant

|

sakal

मोत्यांचा नेकलेस

मोत्यांचा नेकलेस नेहमीच क्लासी दिसतो. साध्या सूटलाही तो रॉयल आणि महागडा लूक देऊ शकतो. मिनिमल पण आकर्षक स्टाइल हवी असेल तर हा पर्याय निवडा.

Pearl Necklace

|

sakal

ऑक्सिडाइज्ड नेकलेस

एथनिक लूकसाठी ऑक्सिडाइज्ड नेकलेस नेहमीच छान दिसतो. साध्या सूटसोबत हा नेकलेस घातल्यावर लूक आणखी सुंदर आणि स्टायलिश दिसतो.

Oxidized Necklace

|

sakal

कुंदन नेकलेस

फेस्टिव्ह लूकसाठी कुंदन नेकलेस हा एक छान पर्याय आहे. तो कोणत्याही रंगाच्या आणि डिझाइनच्या सूटसोबत सुंदर दिसतो.

Kundan Necklace

|

sakal

लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसाचंय? मग 'या' ७ एक्सेसरीज नक्की घालाच

Bridal Accessories for Modern Look

|

sakal

आणखी वाचा