तासनतास किचनमध्ये रेंगाळणं नको! राखीसाठी बनवा 'या' ४ हेल्दी नो-बेक मिठाई

Anushka Tapshalkar

रक्षाबंधनासाठी झटपट गोडधोड!

राखीच्या सणासाठी काहीतरी खास गोड बनवायचंय, पण तासन्‌तास स्वयंपाकघरात उभं राहायचं नाही? मग हे 4 नो-बेक डेसर्ट्स नक्की ट्राय करा!

Raksha Bandhan No-Bake Healthy Sweets

|

sakal

अॅप्रिकॉट, डेट आणि कोकोनट बाइट्स

खजूर, सुकलेली जर्दाळं, बदाम, अक्रोड, खोबरं आणि चिया सीड्सपासून बनवा मऊ आणि स्वादिष्ट डेट बाइट्स. सर्व साहित्य ब्लेंड करून छोटे गोळे तयार करा आणि वरून खोबरं लावा.

Apricot, Date and Coconut Bites

|

sakal

क्रॅनबेरी-पिस्ता डेट रोल्स

खजूराच्या गोडव्याला पिस्ता, बदाम आणि ड्राय क्रॅनबेरीजची मस्त साथ द्या. मिश्रणाचा रोल बनवून 30 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर त्याचे छोटे गोल काप करा.

Cranberry-Pistachio Date Rolls

|

sakal

डेट रोल्सना फेस्टिव्ह लूक!

राखीच्या सेलिब्रेशनसाठी डेट रोल्सचे साधे गोल कापण्याऐवजी पिनव्हील-स्टाइल स्लाइस करा. दिसायला आकर्षक आणि खायलाही भन्नाट!

Cranberry-Pistachio Dates Rolls

|

sakal

ट्रेल मिक्स चॉकलेट क्लस्टर्स

डार्क चॉकलेट, बदाम, काजू, ड्राय क्रॅनबेरीज, ब्लूबेरी आणि सीड्स एकत्र करून तयार करा कुरकुरीत चॉकलेट क्लस्टर्स. चॉकलेटमध्ये ट्रेल मिक्स मिक्स करा, छोटे क्लस्टर्स बनवा आणि 10-15 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा.

Trail Mix Chocolate Clusters

|

sakal

ट्रेल मिक्स डेट लाडू

पारंपरिक लाडूंना द्या मॉडर्न ट्विस्ट! खजूर, काजू, बदाम, ड्राय बेरीज, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया एकत्र करून बनवा स्वादिष्ट ट्रेल मिक्स डेट लाडू.

Trail Mix Date Ladoo

|

sakal

लाडू बनवण्याची सोपी पद्धत

ट्रेल मिक्स हलकं भाजून त्यातील अर्धं मिश्रण जाडसर बारीक करा. खजूराची पेस्ट, गूळ? नाही—खजूरच, तूप आणि उरलेलं ट्रेल मिक्स एकत्र करून मिश्रणाचे छोटे लाडू वळा.

Trail Mix Dates Ladoo

|

sakal

फ्रिजमध्ये सेट होऊ द्या

या डेसर्ट्सची खासियत म्हणजे बेकिंगची गरज नाही. तयार केलेले बाइट्स, रोल्स किंवा लाडू काही वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यावर ते छान सेट होतात.

Store in Fridge

|

sakal

रक्षाबंधनला स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ 7 नेकलेस ट्राय कराच

Stylish Necklace Designs for Raksha Bandhan

|

sakal

आणखी वाचा