Vinod Dengale
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाला टिळा लावून त्याला राखी बांधते. यावेळी टिळ्यावर अक्षता लावण्याचीही परंपरा आहे.
tradition
eSakal
भुवयांच्या मधोमध तिलक लावणं शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार हे स्थान ज्ञान आणि चेतनेचं केंद्र मानलं जातं.
Tilak
eSakal
‘अक्षत’ म्हणजे अखंड किंवा न तुटलेला तांदूळ. त्यामुळे अक्षता भाऊ-बहिणीचं नातं कायम अखंड राहण्याचं प्रतीक मानली जाते.
Akshata
eSakal
रक्षाबंधनाला भावाला अक्षता लावताना त्याच्या दीर्घायुष्याची आणि मंगलमय आयुष्याची कामना केली जाते. भावाचं आयुष्य सुखी आणि समृद्ध राहावं, अशी भावना असते.
Long Life
eSakal
धार्मिक परंपरेत तांदळाला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अक्षता लावल्याने भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येत राहावी, अशी मान्यता आहे.
prosperity
eSakal
काही धार्मिक मान्यतांनुसार टिळ्याचा संबंध भगवान विष्णूंशी आणि अक्षतांचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे टिळा आणि अक्षता यांना शुभ मानलं जातं.
Vishnu-Lakshmi
eSakal
अक्षता लावताना तांदळाचे दाणे तुटलेले किंवा खंडित नसावेत, अशी परंपरा आहे. कारण ‘अक्षत’ म्हणजेच अखंड.
Akshata
eSakal
अक्षता लावण्यामागे भाऊ-बहिणीचं नातं सदैव प्रेमाने आणि विश्वासाने जोडलेलं राहावं, अशी भावना आहे.
Rakhi
eSakal
SALT AND CLOVE
esakal