रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्हीमध्ये काय फरक आहे?

Anushka Tapshalkar

सणाची वेळ वेगळी

रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो, तर भाऊबीज हा सण दीपावलीनंतर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो.

Rakshabandhan VS Bhaubeej

|

sakal

विधींमध्ये बदल

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या हातावर राखी बांधतात, तर भाऊबीजेच्या दिवशी बहिणी भावाचे औक्षण करतात आणि त्याला प्रेमाने भोजन घालतात.

Rakshabandhan VS Bhaubeej

|

sakal

नावांचा अर्थही वेगळा

‘रक्षाबंधन’ म्हणजे संरक्षणाचा धागा, तर ‘भाऊबीज’ संस्कृतमध्ये ‘भागिनी हस्त भोजना’ म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ बहिणीच्या हातून प्रेमाने दिलेले जेवण असा होतो.

Rakshabandhan VS Bhaubeej

|

sakal

बहिणीची भूमिका वेगळी

रक्षाबंधनात बहिण राखी बांधून भावाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते, तर भाऊबीजेला ती त्याचे स्वागत करून औक्षण करते आणि दीर्घायुष्याची कामना करते.

Rakshabandhan VS Bhaubeej

|

sakal

भावाची भावना दोन्ही सणांत महत्त्वाची

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे आश्वासन देतो, तर भाऊबीजेच्या दिवशी तो तिला भेटवस्तू देऊन तिच्यावरील प्रेम व्यक्त करतो.

Rakshabandhan VS Bhaubeej

|

sakal

दोन्ही सणांत प्रेम आणि स्नेहाचा भाव

रक्षाबंधन हा सण भावनिक नातेसंबंध दृढ करतो, तर भाऊबीज या सणात त्या नात्यात सेवा, प्रेम आणि आपुलकीची भावना वाढवली जाते.

Rakshabandhan VS Bhaubeej

|

sakal

सणांचा माहोलही वेगळा

रक्षाबंधन हा सण धार्मिक वातावरणात येतो, तर भाऊबीज हा दीपावलीनंतरच्या आनंददायी आणि प्रकाशमय वातावरणात साजरा होतो.

Rakshabandhan VS Bhaubeej

|

sakal

पाच पांडवांची पूजा का केली जाते? दिवाळीतील या प्रथेमागचं कारण जाणून घ्या

Sakal

आणखी वाचा