आशुतोष मसगौंडे
तेलुगु चित्रपटातसृष्टीतील आघाडीचा अभिनेता राम चरण आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 27 मार्च 1985 मध्ये झाला.
राम चरण टॉलीवूडमध्ये सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहे. 2013 पासून फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटी यादीत त्याचा समावेश होत आहे.
राम चरणला आतापर्यंत दोन फिल्मफेअर पुरस्कार, दोन नंदी पुरस्कार, दोन CineMAA पुरस्कार आणि दोन संतोषम सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
अभिनेता चिरंजीवी आणि सुरेखा यांचा मुलगा, असलेल्या राम चरणने चिरुथा (2007) या ॲक्शन चित्रपटातून पदार्पण केले होते.
राम चरणने काम केलेला राजामौली यांचा काल्पनिक ॲक्शनपट मगधीरा (2009), आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलगू चित्रपटांपैकी एक आहे
राम चरण चित्रपट कारकिर्दीच्या पलीकडे, पोलो टीम राम चरण हैदराबाद पोलो रायडिंग क्लबचा मालक आहे.
राम चरणचा उपासना कामिनेनीशी विवाह झाला आहे. त्यांना क्लिन कारा कोनिडेला नावाची मुलगी आहे.