Apurva Kulkarni
देशभरात आज रामनवमी साजरी केली जातेय. सर्वत्र प्रभू श्रीरामांचा जयघोष पहायला मिळतोय.
दरम्यान आज राम नवमीला रवी पुष्य योग, सुकर्मा योग आणि धन योग यांचा एकत्र योग जुळून आलाय.
त्यामुळे पाच राशींसाठी ही रामनवमी विशेष ठरणार आहे. ज्यामुळे या पाच राशींच्या व्यक्तींना मोठा लाभ होणार आहे.
वृषभ राशीला ही रामनवमी फलदायी ठरणार आहे. प्रभू श्रीरामाची सेवा केल्यास त्यांना लवकर यश प्राप्त होईल.
कर्क राशीसाठी ही रामनवमी खूप शुभ आहे. आजची रामनवमी कर्क राशीसाठी फलदायी आहे.
या रामनवमीला तुळ राशीला प्रभु श्रीरामासोबत लक्ष्मीचा सुद्धा अशिर्वाद लाभणार आहे.
धनु राशीसाठी या रामनवमीला रवी पुष्य योग आणि धन योग आहे. त्यामुळे धनु राशीसाठी ही रामनवमी विशेष आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आज दिवस खूप शुभ आहे. प्रभू श्रीराम आजच्या दिवशी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.