रामशेज किल्ला किती वर्षे जुना आहे?

Aarti Badade

रामशेज किल्ला किती वर्षे जुना आहे?

नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा मराठा इतिहासातील महत्त्वाचा काळ १६७१-७२ पासून सुरू होतो, त्यामुळे त्याला सुमारे ३५५ वर्षांचा ऐतिहासिक संदर्भ आहे.

Ramsej Fort | sakal

रामशेज किल्ला कुठे आहे?

रामशेज किल्ला महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून साधारण १० ते १४ किलोमीटर अंतरावर असून, निसर्गरम्य डोंगरावर वसलेला आहे.

Ramsej Fort | sakal

मराठ्यांनी किल्ला स्वराज्यात आणला

छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती मोरोपंत पिंगळे यांनी १६७१-७२ च्या सुमारास रामशेज किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केल्याचे सांगितले जाते.

Ramsej Fort | sakal

मुघलांविरुद्ध दिली दीर्घ लढाई

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात रामशेज किल्ल्यावरील मराठ्यांनी मुघल सैन्याचा अनेक वर्षे धैर्याने सामना केला.

Ramsej Fort | sakal

साडेसहा वर्षांच्या संघर्षाची आठवण

रामशेज किल्ल्याचा इतिहास मुघलांविरुद्ध मराठ्यांनी दिलेल्या सुमारे साडेपाच ते साडेसहा वर्षांच्या लढ्यामुळे विशेष प्रसिद्ध आहे.

Ramsej Fort | sakal

किल्ल्याशी जोडली आहे प्रभू श्रीरामांची आख्यायिका

स्थानिक आख्यायिकेनुसार, वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती, असे मानले जाते.

इतिहास आणि ट्रेकिंगचा अनुभव

ऐतिहासिक महत्त्व, डोंगरावरील सुंदर दृश्ये आणि चढाईचा अनुभव यांमुळे रामशेज किल्ला इतिहासप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी आकर्षण ठरतो.

Ramsej Fort | sakal

हरिहर किल्ला किती वर्षे जुना आहे?

Harihar Fort

| Sakal
येथे क्लिक करा