सकाळ डिजिटल टीम
२०१३ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'ये जवानी है दीवानी' री-रिलिजमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या जोडीला पुन्हा एकत्र पाहून त्यांचे चाहते आनंदित झाले आहेत.
रणबीर आणि दीपिका लवकरच कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ मध्ये विशेष कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत.
आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिनही या रोमँटिक कॉमेडीमध्ये ‘ये जवानी है दीवानी’च्या जुन्या आठवणींना उजाळा देतील.
कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून, शर्वरी वाघ मुख्य अभिनेत्री म्हणून दिसू शकतात.
या चित्रपटाने ‘ये जवानी है दीवानी’ च्या सिक्वलसाठी मार्ग मोकळा केला आहे का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
४० कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘ये जवानी है दीवानी’ने बॉक्स ऑफिसवर तब्बल २०१ कोटींचा व्यवसाय केला होता.