Yashwant Kshirsagar
चंदेल राजपूत वंशातील कन्या आणि गोंडवनाच्या राणी होत्या खऱ्या अर्थाने दुर्गावती भवानी होत्या.त्यांची कहाणी आजही अजरामर आहे.
Rani Durgavati History
esakal
अकबराच्या जुलमी सत्तेसमोर न झुकता राणी दुर्गावती यांनी २४ जून १५६४ रोजी वीरमरण पत्करले. मुघलांशी लढताना त्यांनी स्वतःची तलवार स्वतःच्या छातीत खुपसून घेतली. हा दिवस त्यांचा बलिदान दिवस म्हणून पाळला जातो.
Rani Durgavati History
esakal
राणी दुर्गावती यांची गणना देशातील महान वीरांगनांमध्ये केली जाते. आपली मातृभूमी आणि आत्मसन्मान जपण्यासाठी त्यांनी प्राणांचे बलिदान दिले.
Rani Durgavati History
esakal
त्यांचा जन्म २४ जून १५२४ रोजी—दुर्गा अष्टमीच्या दिवशी—बांदा जिल्ह्यात झाला. त्या कालिंजरचे चंदेल राजा कीर्ती सिंह यांच्या एकमेव कन्या होत्या.
Rani Durgavati History
esakal
राणी बालपणापासूनच घोडेस्वारी, तलवारबाजी आणि तिरंदाजी यांसारख्या युद्धकलांमध्ये निपुण होत्या. त्यांनी तिरंदाजी आणि आग्नेयास्त्रांच्या वापराचे सखोल प्रशिक्षण घेतले होते.
Rani Durgavati History
esakal
दुर्गावती यांचा विवाह गोंड राजा दलपत शाह यांच्याशी झाला. गडमंडला राज्यावर त्यांची सत्ता होती. लग्नानंतर सात वर्षांतच पतीचे निधन झाले.
Rani Durgavati History
esakal
पतीच्या निधनावेळी मुलगा केवळ पाच वर्षांचा होता. राणीने गोंडवानाच्या प्रशासनाची सूत्रे स्वतः हाती घेतली आणि सुमारे १६ वर्षे राज्य केले. त्यांचे राज्य आजच्या जबलपूर परिसराभोवती होते.
Rani Durgavati History
esakal
१५५६ मध्ये माळव्याच्या सुलतान बाज बहादूरने गोंडवानावर आक्रमण केले. राणीने असीम शौर्य दाखवून त्याचा दारुण पराभव केला.
Rani Durgavati History
esakal
१५६२ नंतर मुघलांनी गोंडवानाला साम्राज्यात विलीन करण्याचा प्रयत्न केला. आसफ खानने दोनदा आक्रमण केले. राणी मुलासह हत्तीवर स्वार होऊन रणांगणावर दाखल झाल्या आणि पहिले आक्रमण परतवले.
Rani Durgavati History
esakal
१५६४ च्या निर्णायक लढाईत अनेक बाण लागून राणी गंभीर जखमी झाल्या. सैनिकाने त्यांना मारण्यास नकार दिल्याने त्यांनी स्वतः तलवार छातीत खुपसून शत्रूच्या हाती न जाता वीरमरण पत्करले.
Rani Durgavati History
esakal
Why JCB Is Yellow
esakal