Yashwant Kshirsagar
राजा-रजवाड्यांच्या वीरकथा आपण अनेकदा ऐकतो, पण भारतीय वीरांगनांची गाथा मात्र तुलनेने कमी सांगितली जाते. आज आपण त्याच एका महान रानीबद्दल जाणून घेणार आहोत – गुजरातची राणी नायकी देवी.
Rani Naiki Devi History
esakal
राणी नायकी देवी कदंब शासक महामंडलेश्वर परमादी यांच्या कन्या होत्या. अस्त्र-शस्त्र, घोडेस्वारी, बाणविद्या आणि युद्धकौशल्यात त्या पारंगत होत्या.
Rani Naiki Devi History
esakal
त्यांचा विवाह गुजरातच्या सोलंकी (चालुक्य) राजा अजयपाल यांच्याशी झाला. राजा अजयपाल यांचे चार वर्षांतच निधन झाल्यावर त्यांचा मुलगा मूलराज द्वितीय गादीवर बसला. राणी नायकी देवी राजमाता म्हणून राज्यकारभार सांभाळू लागल्या.
Rani Naiki Devi History
esakal
११७५ ते १२०६ दरम्यान मोहम्मद गोरीने भारतावर अनेकदा आक्रमण केले. ११७८ मध्ये त्याने गुजरातच्या मार्गाने भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
Rani Naiki Devi History
esakal
गोरीचे लक्ष चालुक्य राजधानी अन्हिलवाड पाटणवर होते. त्यावेळी राज्य एका लहान मुलाच्या आणि राणीच्या हातात असल्याने गोरीला विजय सहज वाटला.
Rani Naiki Devi History
esakal
राणी नायकी देवीने युद्धाची तयारी सुरू केली आणि पृथ्वीराज चौहान सहित शेजारील राजांना मदतीची विनंती केली. मात्र नद्दूल, जालोर आणि आबूच्या काही राजांशिवाय फारशी मदत मिळाली नाही.
Rani Naiki Devi History
esakal
राणीने आजच्या राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील कसाहरादा (गदरघट्टा) या उबडखाबड डोंगराळ प्रदेशात युद्ध करण्याचे ठरवले. हा माउंट आबूच्या पायथ्याशी असलेला भाग होता.
Rani Naiki Devi History
esakal
गोरीची सेना कसाहरादा येथे पोहोचली, तेव्हा राणी नायकी देवी आपल्या मुलासोबत स्वतः रणभूमीवर उतरल्या. या युद्धाला ‘कसाहरादाचे युद्ध’ म्हणतात.
Rani Naiki Devi History
esakal
चालुक्य सैन्याने गोरीच्या सैन्याला पराभूत केले. मोहम्मद गोरीला काही अंगरक्षकांसह पळून जावे लागले. त्यानंतर त्याने कधीही गुजरातकडे पुन्हा नजर टाकली नाही.
Rani Naiki Devi History
esakal
सोमेश्वर, मेरुतुंग आणि मिन्हाज-उस-सिराज यांसारख्या लेखकांनी या युद्धाचा उल्लेख केला आहे. तरीही राणी नायकी देवीला इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही. त्यांच्या शौर्याची गाथा आजही प्रेरणादायी आहे.
Rani Naiki Devi History
How Elephants Drink Water
esakal