ब्रिटिश सैन्याशी शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या; राणी तलाश कुंवारी यांची शौर्यगाथा

Yashwant Kshirsagar

राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण

अमोधाच्या राणी तलाश कुंवारी यांनी आपल्या राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्यांची शौर्यगाथा आजही लोकांच्या स्मरणात जिवंत आहे.

Rani Talash Kunwari history

|

esakal

१८५७ चा उठाव

बस्ती-फैजाबाद महामार्गावर वसलेल्या अमोधा संस्थानाने १८५७ च्या उठावात ब्रिटिशांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. त्यावेळी या प्रदेशावर राणी तलाश कुंवारी यांचे राज्य होते.

Rani Talash Kunwari history

|

esakal

गादीवर आरूढ

राणीचे पती राजा जंग बहादूर सिंग यांच्या निधनानंतर १८५३ मध्ये त्या गादीवर आल्या. त्यांना स्वतःची अपत्ये नव्हती, तरीही त्यांनी राज्य सांभाळले.

Rani Talash Kunwari history

|

esakal

उठावाची बातमी आणि बैठक

१८५७ च्या उठावाची बातमी समजताच राणीने विश्वासू सहकाऱ्यांसोबत बैठक बोलावली. त्यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने बस्ती-फैजाबाद मार्ग रोखून धरला.

Rani Talash Kunwari history

|

esakal

घाघरा नदीवर ब्रिटिशांची अडचण

राणीच्या सैन्याने घाघरा नदीवरील ब्रिटिश जलवाहतूक विस्कळीत केली. सूर्यवंशी, विसेन आणि पठाण अशा विविध समुदायांचे सैनिक त्यांच्या सैन्यात होते.

Rani Talash Kunwari history

|

esakal

ब्रिटिशांचा नौदलाचा वापर

वारंवार पराभवामुळे हताश झालेल्या ब्रिटिशांनी अवध प्रांतात पहिल्यांदाच नौदलाची मदत घेतली. घाघरा नदीवर HMS युद्धनौका आली, पण राणीच्या पराक्रमापुढे तिलाही माघार घ्यावी लागली.

Rani Talash Kunwari history

|

esakal

नेपाळची मदत आणि कर्नल रोक्रॉफ्ट

ब्रिटिशांनी नेपाळकडून सैन्य व तोफांची मदत मागितली. जानेवारी १८५८ मध्ये कर्नल रोक्रॉफ्टच्या नेतृत्वाखाली सैन्य अमोधाकडे कूच केले, पण त्यांना पराभव पत्करावा लागला.

Rani Talash Kunwari history

|

esakal

पाखेरवाजवळचा निर्णायक सामना

पुरुषांचा पेहराव करून राणी स्वतः युद्धाच्या आघाडीवर उभी होती. पाखेरवाजवळ तिचा घोडा जखमी झाला आणि तिला किल्ल्यात माघार घ्यावी लागली.

Rani Talash Kunwari history

|

esakal

शेवटचा संकल्प आणि बलिदान

राणी म्हणाली, “ब्रिटिश मला जिवंत किंवा मृत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. मी स्वतःच्या कट्यारीने प्राण संपवेन, पण माझा देह त्यांच्या हाती लागणार नाही.” २ मार्च १८५८ रोजी त्यांनी स्वतःच्या कट्यारीने प्राण अर्पण केले.

Rani Talash Kunwari history

|

esakal

पूजनीय वारसा

हरैया भागात राणी तलाश कुंवारी यांना देवतेप्रमाणे पूजले जाते. त्यांच्या पुतळ्या, संग्रहालय, मंदिर, किल्ल्याची संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार उभारण्यात आले आहेत. अमोधा किल्ल्याचे अवशेष आजही त्यांच्या शौर्याची साक्ष देतात.

Rani Talash Kunwari history

|

esakal

शरणागती नाकारली, मृत्यू स्वीकारला; अकबराला धडकी भरवणाऱ्या राणी दुर्गावती

Rani Durgavati History

|

esakal

येथे क्लिक करा