Mayur Ratnaparkhe
रंजना प्रकाश देसाई या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आहेत.
रंजना देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी यापूर्वी सीमांकन आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
तसेच त्यांची समान नागरी संहिता तयार करणाऱ्या समितीच्या प्रमुख म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.
२०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यापासून, त्यांनी विविध संवैधानिक आणि प्रशासकीय भूमिकांमध्ये काम केले आहे.
३० ऑक्टोबर १९४९ रोजी जन्मलेल्या रंजना देसाई यांनी १९७० मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमधून कला शाखेची पदवी मिळवली आहे.
याशिवाय १९७३ मध्ये मुंबईतील सरकारी कायदा महाविद्यालयातून एलएलबीची पदवी प्राप्त केलेली आहे.
त्यांनी १९७३ मध्ये वकिली सुरू केली आणि १९७९ मध्ये सरकारी वकील बनल्या.
१९९६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले.
रंजना देसाई या २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयामधून निवृत्त झाल्या आहेत.
medicine taste
sakal