kimaya narayan
युट्युब वरील पॉडकास्ट चॅनेलच्या माध्यमातून अभिनेता रणवीर अलाहाबादीयाने स्वतःचं नाव कमावलं. त्याच्या मुलाखती या लोकप्रिय आहेत.
एका शोमध्ये स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादीया ट्रोल होतोय. या घटनेनंतर त्याने जाहीर माफी मागितली
रणवीर एका उच्चभ्रू कुटूंबाशी संबंधित आहे. त्याचे वडील गौतम हे फिजिशियन आहेत तर आई स्त्रीरोग तज्ञ आहे. त्याचे आई-वडील मेडिकल क्षेत्रात प्रसिद्ध आहेत
धीरूभाई अंबानी शाळेत त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर आई-वडिलांप्रमाणे मेडिकल क्षेत्र न निवडता त्याने इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. द्वारकादास संघवी कॉलेजमधून त्याने इंजिनियरिंग पूर्ण केलं.
कॉलेजमध्ये असतानाच रणवीर दारूच्या व्यसनाधीन झाला होता इतकंच नाही तर तो गांजाचंही सेवन करायचा. पण पुढे त्याला फिटनेसची सवय लागली आणि त्यातून त्याने या व्यसनांवर मात केली.
कॉलेजमध्ये असतानाच तो युट्युबकडे वळला. बिअर बायसेप्स, रणवीर अलाहबादीया पॉडकास्ट या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून त्याने स्वतःचा द मंक एन्टरटेनमेन्ट हा ब्रँड सुरु केला.
आज रणवीर 60 कोटी संपत्तीचा मालक आहे तर तो महिन्याला 35 लाख रुपये कमवतो.