Indian Painted Frog : नांदेडमध्ये निसर्गाचा चमत्कार! दक्षिण भारतात आढळणारा 'हा' आकर्षक रंगाचा बेडूक थेट मराठवाड्यात कसा आला?

बाळकृष्ण मधाळे

दुर्मिळ बेडूक आढळला

नांदेड शहरातील एका निवासी परिसरात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या 'इंडियन पेंटेड फ्रॉग' (Uperodon Taprobanicus) या बेडकाच्या प्रजातीची नुकतीच नोंद झाली आहे.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

जैवविविधतेसाठी महत्त्वाची बाब

स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. प्रा. डॉ. विशाल मराठे यांच्या निवासस्थानी हा बेडूक आढळून आला आहे.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

शरीरावर आकर्षक रंगसंगती

बेडकाच्या आकर्षक रंगसंगतीमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक रचनेमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

कशी आहे जीवनशैली?

माहितीनुसार, ही प्रजाती प्रामुख्याने जमिनीखाली राहणाऱ्या (Fossorial) जीवनशैलीसाठी ओळखली जाते.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

जमिनीखालीच वास्तव्य

वर्षातील बहुतांश काळ हे बेडूक जमिनीखालीच वास्तव्य करतात आणि मुसळधार पावसानंतर विणीच्या हंगामात तात्पुरत्या पाणथळ जागांजवळ बाहेर येतात.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

बेडकाचे खास वैशिष्ट्य

बेडकाच्या पाठीवरील आकर्षक रंगसंगती हे या प्रजातीचे खास वैशिष्ट्य आहे.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

कुठे आढळतो बेडूक?

'इंडियन पेंटेड फ्रॉग' ही प्रजाती प्रामुख्याने दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या काही भागांत आढळते.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

मराठवाड्यातील दुर्मिळ नोंद

मात्र, मराठवाड्यासारख्या निम-ओसाड प्रदेशात या प्रजातीची नोंद होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

बदलत्या पर्यावरणाला घेताहेत जुळवून

शहरी अथवा निम-शहरी परिसरात या बेडकाचे दर्शन होणे, बदलत्या पर्यावरणाशी वन्यजीव जुळवून घेत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

Rare Indian Painted Frog in Marathwada

|

esakal

Albino Alligator Gar : निसर्गाचा अद्भूत चमत्कार! रायगडमध्ये आढळला पिवळ्या-नारंगी रंगाचा 'अल्बिनो गार'; तोंड पाहून बसेल धक्का

What Is an Albino Alligator Gar?

|

esakal

येथे क्लिक करा...