२०० वर्षांनी खऱ्या जंगली घोड्याचा जन्म

सकाळ डिजिटल टीम

जंगली घोडा

कझाकस्तानच्या गवताळ मैदानात जवळपास २०० वर्षांनंतर प्रजेवाल्स्की घोड्याच्या पिल्लाचा जन्म झालाय.

Wild Horse

|

Esakal

दोन पिल्लं

दोन घोडींनी आठ दिवसांच्या अंतराने दोन शिंगरूंना जन्म दिला आहे. ही दोन्ही नर जातीची आहेत.

Wild Horse

|

Esakal

पहिलं शिंगरू

२२ ऑगस्टला सात वर्षांच्या घोडीने पहिलं शिंगरू जन्माला घातलं. त्यानंतर आठ दिवसांनी दुसरं शिंगरू जन्मलं.

Wild Horse

|

Esakal

दुसरं शिंगरू

उम्ब्रा नावाच्या सहा वर्षांच्या घोडीने दुसऱ्या नर शिंगरू जन्माला घातलं असून हा दुर्मिळ क्षण आहे.

Wild Horse

|

Esakal

ऐतिहासिक

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार, जवळपास दोन शतकांत या मैदानात या प्रजातीचा हा पहिला जन्म असू शकतो.

Wild Horse

|

Esakal

घोड्यांचं पुनर्वसन

२०२४ पासून आतापर्यंत युरोपमधील प्राणिसंग्रहालयांतून २२ प्रजेवाल्स्की घोडे कझाकस्तानमध्ये आणण्यात आले आहेत.

Wild Horse

|

Esakal

संख्या वाढणार

२०२९ पर्यंत कझाकस्तानमध्ये या घोड्यांची संख्या ४० पर्यंत वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे.

Wild Horse

|

Esakal

नामशेष

शिकार आणि शेतीसाठी जमिनीचा वापर वाढल्याने या घोड्यांची संख्या घटली. या घोड्यांची प्रजाती ही जगातली शेवटची जंगली घोड्यांची प्रजाती मानली जाते.

Wild Horse

|

Esakal

हत्तीला कडक उन्हातही का येत नाही घाम?

 Amazing Facts About Elephant 

|

sakal 

इथं क्लिक करा