आई राजा उदो उदो! तुळजापूरच्या ज्योत घेऊन जाण्याची अनोखी परंपरा

Monika Shinde

तुळजापूर

आई राजा उदो उदो! तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरातून ज्योत घेऊन जाण्याची अनोखी आणि पावन परंपरा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून घटस्थापनेच्या एक दिवस आधी भवानी ज्योत प्रज्वलित केली जाते.

ज्योत

ही ज्योत नेणे ही हजारो वर्षांची पारंपरिक परंपरा असून, भक्तांनी ती अत्यंत श्रद्धेने पाळली जाते.

घटस्थापना

यंदा २२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापना साजरी होणार असून, एक दिवस आधीच ज्योत नेण्याची विधी पार पडणार आहे.

तरुणांचा उत्साह

महाराष्ट्रातील लहान-मोठ्या गावांतून तरुणाई मोठ्या उत्साहाने "आई राजा उदो उदो!" असा गजर काढत पायी ज्योत घेऊन निघते.

ज्योत गावोगावी पोहोचते

ही ज्योत गावोगावी पोहोचते आणि लोकांच्या मनात भक्ती व उत्साह निर्माण करते

महाराष्ट्राची परंपरा

तुळजापूरच्या भवानी मंदिरातून सुरू झालेली ही परंपरा महाराष्ट्रातील संस्कृतीची ओळख आहे.

नवरात्रीच्या घटमालेसाठी प्रामुख्याने वापरली जाणारी फुले कोणती?

येथे क्लिक करा