Aarti Badade
थंडीच्या दिवसात काहीतरी गरम आणि चटकदार खावंसं वाटतंय? मग दक्षिण भारतीय पद्धतीचा पौष्टिक 'रसम राईस' नक्की ट्राय करा.
Rasam Rice winter recipe
Sakal
भात, तूर डाळ, टोमॅटो आणि चिंचेच्या कोळापासून बनवलेला हा पदार्थ चवीला आंबट-तिखट आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Rasam Rice winter recipe
Sakal
अर्धा कप तांदूळ आणि पाव कप तूर डाळ एकत्र धुवून कुकरमध्ये खिचडीसारखी मऊ शिजवून घ्या.
Rasam Rice winter recipe
Sakal
एका भांड्यात तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालून खमंग फोडणी तयार करा.
Rasam Rice winter recipe
Sakal
फोडणीत कांदा, टोमॅटो परतून घ्या. त्यानंतर रसम पावडर, हळद आणि चिंच-गुळाचा कोळ घालून मिश्रण ५-७ मिनिटे चांगले उकळू द्या.
Rasam Rice winter recipe
Sakal
तयार झालेल्या रसममध्ये शिजवलेला डाळ-भात मिसळा. चवीनुसार मीठ टाकून सर्व घटक एकजीव करा, जेणेकरून भाताला रसमची चव लागेल.
Rasam Rice winter recipe
Sakal
रसममध्ये काळी मिरी पूड घातल्यास सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. तसेच वरून साजूक तूप घातल्याने रसम राईस अधिक चविष्ट लागतो.
Rasam Rice winter recipe
Sakal
कोथिंबीर पेरून हा रसम राईस सुपसारखा प्या किंवा जेवणात खा. हा हलका आहार पचायला सोपा आणि पोटाला थंडावा देणारा आहे.
Rasam Rice winter recipe
Sakal
Vrat Special Recipe Ratale Kap
sakal