उपवास स्पेशल स्नॅक्स... बाहेरून क्रिस्पी, आतून मऊ रताळ्याचे काप

Aarti Badade

काहीतरी वेगळं आणि चविष्ट!

उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी किंवा वडे आठवतात. पण यंदा काहीतरी हटके ट्राय करायचं असेल, तर पौष्टिक 'रताळ्याचे काप' नक्की बनवून पहा.

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

Sakal

कमी साहित्य, जास्त चव

या रेसिपीसाठी तुम्हाला फक्त मध्यम आकाराची रताळी, साबुदाणा पीठ, सैंधव मीठ आणि तूप किंवा शेंगदाणा तेल एवढंच साहित्य लागेल.

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

Sakal

रताळ्याची पूर्वतयारी

रताळी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्या. त्यानंतर त्याचे पातळ गोल काप करा. हे काप मध्यम शिजवून घेतल्यास रेसिपी लवकर तयार होते.

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

Sakal

कुरकुरीतपणाचे गुपित

रताळ्याच्या प्रत्येक कापाच्या दोन्ही बाजूंना साबुदाण्याचे पीठ व्यवस्थित लावून घ्या. यामुळे काप तळताना छान कुरकुरीत होतात.

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

Sakal

तव्यावर करा शॅलो फ्राय

तव्यावर थोडे तूप किंवा शेंगदाणा तेल गरम करा. साबुदाणा पीठ लावलेले काप तव्यावर ठेवून मध्यम आचेवर भाजून घ्या.

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

Sakal

दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा

काप एका बाजूने सोनेरी झाले की ते उलटून दुसऱ्या बाजूनेही खरपूस तळून घ्या. तुपाचा वापर केल्यास याला अधिक छान चव येते.

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

Sakal

लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचे!

हे काप बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात. उपवास नसतानाही मधल्या वेळेत खाण्यासाठी हा एक उत्तम स्नॅक आहे.

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा!

तुमचे चविष्ट रताळ्याचे काप तयार आहेत! दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत याचा आस्वाद घ्या.

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

Sakal

हिवाळ्यात खास! दही वापरून तयार करा हॉटेलसारखं क्रिमी पालक पनीर

Palak Paneer Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा