Rashid Khan: राशीदने 25 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड

अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात टी20 मालिकेतील पहिला सामना 15 मार्च 2024 रोजी झाला. शारशाहला झालेल्या या सामन्यात आयर्लंडने 38 धावांनी विजय मिळवला.

Rashid Khan | X

राशीदची मोठ्या विक्रमाला गवसणी

असे असले तरी अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानने या सामन्यादरम्यान एका मोठा वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली.

Rashid Khan | X

राशीदचा विक्रम

त्याने या सामन्यात तीन विकेट्स घेतले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 विकेट्स पूर्ण केल्या.

Rashid Khan | X

25 व्या वर्षीच करामत

राशीदने 25 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 विकेट्सचा टप्पा गाठला आहे.

Rashid Khan | X

पहिलाच अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेणारा अफगाणिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू आहे.

Rashid Khan | X

350 विकेट्स

त्याने एकूण 191 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 350 विकेट्स घेतल्या आहेत.

Rashid Khan | X

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी

राशीदने कसोटीत 5 सामन्यांत 34 विकेट्स, वनडेत 103 सामन्यांत 183 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 83 सामन्यांत 133 विकेट्स अशा मिळून 350 विकेट्स घेतल्या आहेत.

Rashid Khan | X

Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टरच्या 100 व्या शतकाची 12 वर्षे

Sachin Tendulkar | X/ICC