Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टरच्या 100 व्या शतकाची 12 वर्षे

सकाळ डिजिटल टीम

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम रचले. यातीलच एक मोठा विश्वविक्रम म्हणजे 100 शतकांचा.

Sachin Tendulkar | X/ICC

शतकांचे शतक

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 शतके केली आहे. त्याने 100 वे शतक झळकावण्याच्या विश्वविक्रमाला आता 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Sachin Tendulkar | X/ICC

100 वे शतक

सचिनने 16 मार्च 2012 रोजी आशिया कप स्पर्धेतील मिरपूरला झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 100 वे शतक झळकावले होते.

Sachin Tendulkar | X/ICC

पहिला क्रिकेटपटू

त्यावेळी तो 100 शतके करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता.

Sachin Tendulkar | X/ICC

सचिनची विक्रमी खेळी

सचिनने त्यावेळी 147 चेंडूत 114 धावांची खेळी केली होती. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार मारले.

Sachin Tendulkar | X/ICC

49 वे वनडे शतक

हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 49 वे शतकही होते. त्यामुळे 49 वनडे शतके करणाराही तो पहिला खेळाडू होता. हा विक्रम 2023 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने 50 वे वनडे शतक झळकावत मोडला.

Sachin Tendulkar | X/ICC

भारताचा मात्र पराभव

दरम्यान, सचिनच्या 100 व्या शतकाला विजयाचे तोरण लागले नव्हते. त्या सामन्यात भारताला 5 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.

Sachin Tendulkar | X/ICC

Ranji Trophy 2023-24: सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज

Cheteshwar Pujara | X/BCCIDomestic