Swadesh Ghanekar
राशीद खान याने या २ विकेट्ससह ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला. त्याने वेस्ट इंडिजच्या ब्राव्होचा विक्रम मोडला.
राशीद खान याने ४६० ट्वेंटी-२० सामन्यांत सर्वाधिक ६३३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला काल दोन विकेट्स घेतल्या होत्या.
वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्होच्या नावावर ५८२ सामन्यांत ६३१ विकेट्स आहेत आणि या विक्रमात आता तो दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये सुनील नरीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५३६ सामन्यांत ५७४ विकेट्स आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरने ४२८ सामन्यांत ५३१ विकेट्स घेतल्या आहेत.
बांगलादेशचा स्टार शाकिब अल हसन याच्या नावावर ४४४ सामन्यांत ४९२ विकेट्स आहेत.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडूने ५३८ सामन्यांत ४६६ विकेट्स टिपल्या आहेत.
इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन व पाकिस्तानचा वाहब रियाझ यांनी अनुक्रमे ४१६ व ४१३ विकेट्स घेतल्या आहेत.
महान गोलंदाज लसिथ मलिंगा या विक्रमात ३९० विकेट्ससह नवव्या क्रमांकावर आहे, त्यानंतर सोहेल तन्वीरचा ( ३८९)क्रमांक येतो.