Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला ११ धावांनी पराभूत केलं.
असं असलं तरी या सामन्यात गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या राशिद खानने एका मोठ्या वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली.
राशिदने पंजाबच्या प्रियांश आर्यला ४७ धावांवर बाद केले. ही राशिदने आयपीएलमधील १५० वी विकेट ठरली. त्याने १२२ व्या सामन्यात १५० विकेट्स पूर्ण केल्या.
राशिद आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेणारा ११ वा गोलंदाज ठरला, तसेच सर्वात कमी डावात १५० विकेट्स पूर्ण करणारा तो तिसऱ्याच क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
सर्वात कमी डावात आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर ड्वेन ब्रावो आहे. त्याने १३४ डावात १५० विकेट्स घेतल्या होत्या.
या विक्रमात चौथ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह असून त्याने १२४ डावात १५० आयपीएल विकेट्स घेतल्या होत्या.
राशिदने आता ब्रावो आणि बुमराह यांना मागे टाकत १२२ व्या डावात १५० विकेट्स घेतल्या आहेत.
राशिदच्या वर या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने ११७ डावातच १५० विकेट्स घेतल्या होत्या.
अव्वल क्रमांकावर लसिथ मलिंगा असून त्याने केवळ १०५ डावात १५० आयपीएल विकेट्स घेतल्या.