Pranali Kodre
आयपीएल २०२५ मध्ये २५ मार्च रोजी पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध ११ धावांनी विजयाची नोंद केली.
श्रेयसला आयपीएल २०२५ लिलावात पंजाबने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली.
श्रेयस २५ मार्च रोजी मैदानात उतरताच पंजाबचा १७ वा कर्णधार ठरला. त्याने पहिलाच सामना गाजवत सामनावीर पुरस्कारही जिंकला.
श्रेयसने ४२ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद ९७ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने त्याचात ८ वर्षे जूना विक्रम मोडला आहे.
आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी कर्णधार म्हणून पहिला सामना खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता श्रेयसची नाबाद ९७ धावांची खेळी तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
श्रेयसने २०१८ साली दिल्ली कॅपिटल्सचे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पहिल्यांदा नेतृत्व करताना केलेल्या नाबाद ९३ धावांच्या खेळीला मागे टाकले आहे.
या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर फाफ डू प्लेसिस आहे. त्याने २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार म्हणून पहिला सामना खेळताना पंजाब किंग्सविरुद्ध ८८ धावा केल्या होत्या.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मयंक अगरवाल असून त्याने पंजाब किंग्ससाठी २०२१ मध्ये पहिल्यांदा नेतृत्व करताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद ९९ धावांची खेळी केली होती.
अव्वल क्रमांकावर संजू सॅमसन आहे, त्याने २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सचे पहिल्यांदा कर्णधारपद सांभाळताना पंजाब किंग्सविरुद्ध ११९ धावांची खेळी केली होती.