Apurva Kulkarni
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय.
सगळ्यांच्या मनात घर केलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता स्नॅपचॅटवर आली आहे.
ती तिच्या स्टोरीज, स्नॅप्स आणि स्पॉटलाइटमधून आपल्याला तिच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांना दाखवणार आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे.
'मला नेहमी एक अशी जागा हवी होती जिथे मी खरी आणि थोडी मस्तीत असलेली रश्मिका दाखवू शकेन' असं तिने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलय.
लवकरच भेटू, माझ्या लाडक्या चाहत्यांनो, असं म्हणत रश्मिकाने चाहत्यांना स्नॅपचॅटवर येत असल्याची बातमी दिलीय.
त्यामुळे चाहत्यांना आता तिचे काही खास क्षण स्नॅपचॅटवर पहायला मिळणार आहे. चाहत्यांनाही ती स्नॅपचॅटवर दिसणार याचा आनंद होतोय.