रश्मिकाने शेअर केला तिच्या आणि बहिणीच्या नात्याबद्दलचा किस्सा

Anuradha Vipat

अभिनेत्री रश्मिका मंदाना

अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घालणारी आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच रश्मिका मंदाना

वैयक्तिक आयुष्य

रश्मिकाला नेहमीच तिचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडतं. 

रश्मिकाची बहीण

रश्मिकाला एक लहान बहीण आहे आणि त्यांच्यात १६ वर्षांचं अंतर आहे. रश्मिकाची बहीण आता १० वर्षांची आहे.

बहिणीच्या नात्याबद्दल

‘नो फिल्टर नेहा’ या नेहा धुपियाच्या शोला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रश्मिकानं तिच्या आणि बहिणीच्या नात्याबद्दल सांगितलं आहे

मी चित्रपटांमध्ये

रश्मिका म्हणाली, जेव्हा मी चित्रपटांमध्ये रडते तेव्हा मला बघून ती तीन-चार तास रडते. तिला असं वाटतं की माझी बहीण रडतेय, तिला त्रास होत आहे 

एक अभिनेत्री म्हणून

“ती नेहमी म्हणत असते की, मला अभिनेत्री व्हायचंय. ती मला एक बहीण म्हणून पूर्णपणे ओळखते. पण एक अभिनेत्री म्हणून जेवढं प्रेक्षक मला ओळखतात तेवढंच ती मला ओळखते. असंही रश्मिका म्हणाली

अखेर लग्नाच्या प्रश्नांवर सिद्धार्थने सोडले मौन