छत्रपतींच्या सुईचा डोळा म्हणवला जाणारा किल्ला कोणता ठावूक आहे ?

Apurva Kulkarni

ऐतिहासिक किल्ला रतनगड

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील रतनगड किल्ला हा 400 वर्षे जुना आहे. रतनगडावर पोकळी असलेला टोकदार सुईच्या डोळ्यासारखा दिसणारा हा खडक आहे. त्यामुळे त्याला सुईचा डोळा असं सुद्धा म्हटलं जातं.

Discover Ratanagad Fort

|

esakal

या किल्ल्याचं वैशिष्ठ्य काय?

या किल्ल्याला एकूण 4 दरवाजे आहेत. एक गणेश, दुसरा हनुमान, तिसरा त्र्यंबक आणि चौथा कोकण हे चार दरवाजे या किल्लाला पहायला मिळतील. या किल्ल्याच्या सीमेवरुन जाताना एक महाकायकडे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

Discover Ratanagad Fort

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडता किल्ला

हा ऐतिहासिक सुईच्या डोळ्याचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांकडून जिंकला होता. महाराजांच्या सगळ्यात आवडता किल्ला हा मानला जातो.

Discover Ratanagad Fort

|

esakal

मन मोहून टाकणारी दृश्य

या किल्ल्याच्या टोकावरुन दिसणारी हिरवळ आणि भंडारदरा धरणाची दृश्य तुमचं मन मोहून टाकणारी आहेत. किल्ल्याचं सौदर्य पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल.

Discover Ratanagad Fort

|

esakal

या किल्ल्यावर कसे जाल?

इगतपुरी रेल्वे स्थानकापासून हा किल्ला जवळपास 27 किलोमीटर आहे. तुम्ही रतनवाडीला जाण्यासाठी 6 किमी बोटीनं सुद्धा सफर करु शकता. तसंच 4 किलोमीटर चालून तुम्ही रतनगड ट्रेक सुरु करु शकतात.

Discover Ratanagad Fort

|

esakal

किल्ल्यावर जाण्याची वेळ किती?

या रतनगड किल्ल्यावर जाण्यासाठी कोणतीही विशिष्ठ वेळ दिली नसून तुम्ही हा किल्ला विना शुल्क सर करु शकतात.

Discover Ratanagad Fort

|

esakal

कोणत्या काळात तुम्ही या किल्ल्याला भेट द्याल?

तुम्ही ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या काळात हा किल्ला पाहिलं तर तुम्हाला निसर्गाच्या सौदर्याचा अनुभव घेता येईल. तसंच या किल्ल्यावर फोटो काढण्यास परवानगी सुद्धा आहे.

Discover Ratanagad Fort

|

esakal

मुंबईजवळील ऐतिहासिक खजिना! एलिफंटा लेणी

History and Art of Elephanta Caves

|

Sakal

हे ही पहा...