सकाळ डिजिटल टीम
कोल्हापूरपासून फक्त ५५-६० किमी अंतरावर असलेला मनमोहक राऊतवाडी धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
राऊतवाडी धबधब्यासाठी मार्ग: कोल्हापूर - वाडीपीर - हळदी - राशिवडे - कसबा तारळे - सावरधाण - राऊतवाडी.
धबधब्याचा परिसर हिरवाईने नटलेला असून, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा आवाज तुमचे मन मोहून टाकतो!
राऊतवाडी धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी हजारो पर्यटक इथे भेट देतात.
धबधब्याचा परिसर हा छायाचित्रकारांसाठी पर्वणी आहे! इंस्टाग्रामसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे
धबधब्याजवळ पोहताना किंवा फोटो काढताना काळजी घ्या. पाण्याचा प्रवाह खूप जोरात असतो!
जलस्रोत ही आपली वारसा स्थळे आहेत. कृपया इथे कचरा करू नका आणि निसर्ग स्वच्छ ठेवा
राऊतवाडीजवळ तुम्ही शिवगड, राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्य या ठिकाणीही भेट देऊ शकता.
धबधबा पाहण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. पावसाळ्यात धबधबा अधिकच सुंदर दिसतो!