IPL: जड्डूनं ते करून दाखवलं, जे आजपर्यंत कोणालंच नाही जमलं!

प्रणाली कोद्रे

चेन्नईचा विजय

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला.

CSK | Ravindra Jadeja | IPL | X/IPL

मोलाचा वाटा

चेन्नईच्या या विजयात रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला. त्याला या सामन्यातील सामनावीर पुरस्कारही देण्यात आला आहे.

Ravindra Jadeja | IPL | X/ChennaiIPL

जडेजाची कामगिरी

जडेजाने या सामन्यात 4 षटकात अवघ्या 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर या तिघांच्या विकेट्स घेतल्या.

Ravindra Jadeja | IPL | X/IPL

विक्रम

त्याचमुळे जडेजाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.

Ravindra Jadeja | IPL | X/IPL

अष्टपैलू जडेजा

जडेजाने यापूर्वीच आयपीएलमध्ये 2000 हून अधिक धावा केल्या आहेत, तसेच त्याने 150 हून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

Ravindra Jadeja | IPL | X/IPL

पहिलाच क्रिकेटपटू

त्यामुळे जडेजा असा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने आयपीएलमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा, 100 पेक्षा जास्त विकेट्स आणि 100 पेक्षा अधिक झेल घेतले आहेत.

Ravindra Jadeja | IPL | X/IPL

कोणालाच जमलं नव्हतं

यापूर्वी आयपीएलमध्ये असा विक्रम कोणालाही करता आला नव्हता.

Ravindra Jadeja | IPL | X/IPL

"धोनी जगातील सर्वात प्रेम मिळालेला व्यक्ती", असं कोण म्हणालं?

MS Dhoni | X/ChennaiIPL