"धोनी जगातील सर्वात प्रेम मिळालेला क्रिकेटर", असं कोण म्हणालं?

प्रणाली कोद्रे

चेन्नईचा विजय

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला.

CSK vs KKR | X/IPL

घरच्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर झाला, त्यामुळे चेन्नई संघाला घरच्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

CSK Fans | X/ChennaiIPL

धोनीची झलक

याशिवाय प्रेक्षकांनी चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या फलंदाजीची छोटी झलकही पाहायला मिळाली.

MS Dhoni | X/ChennaiIPL

जल्लोष

दरम्यान, धोनी जेव्हा फलंदाजीला आता तेव्हा प्रेक्षकांमध्ये मोठा जल्लोष झाला.

MS Dhoni - Andre Russell | IPL 2024 | X

रसेलने झाकले कान

त्यावेळी इतका आवाज झाला होता की अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या आंद्रे रसेलला कान झाकावे लागले.

MS Dhoni - Andre Russell | IPL 2024 | X

रसेलची पोस्ट

विशेष म्हणजे सामना झाल्यानंतर रसेलने धोनीचे कौतुकही केले आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर धोनीबरोबरचा फोटो असेली एक पोस्ट शेअर केली आहे.

MS Dhoni - Andre Russell | IPL 2024 | X

सर्वाधिक प्रेम मिळालेला क्रिकेटपटू

तसचे रसेलने या पोस्टच्या खाली कॅप्शन लिहिले आहे की 'मला वाटते की हा व्यक्ती (धोनी) जगातील सर्वात प्रेम मिळालेला क्रिकेटपटू आहे.'

Andre Russell | IPL 2024 | Instagram

पोस्ट व्हायरल

त्याची या पोस्टचा स्क्रिनशॉट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

MS Dhoni - Andre Russell | IPL 2024 | X

IPL मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक धावा काढणारे टॉप-3 क्रिकेटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Romario Shepherd | IPL 2024 | Sakal