सकाळ डिजिटल टीम
काल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला घरच्या मैदानावर पराभव पत्कारावा लागला.
आरसीबीने सीएसकेला प्रथम फलंदाजी करताना १९६ धावांचे आव्हान दिले.
सीएसकेचा डाव १४६ धावांवर गुंडाळत ५० धावांनी विजय मिळवला.
आरसीबीने चेपॉकवर काल तब्बल १७ वर्षांनी विजय मिळवला आणि कालच्या सामन्यात ४ विक्रम रचले गेले.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला सर्वाधिक धावांनी पराभूत करणारा बंगळूरू तिसरा संघ ठरला.
काल विराट कोहलीने काल ३० धावा केल्या आणि एकूण १०८४ धावांसह तो सीएसकेविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
काल धोनीनेही ३० धावांची खेळी केली. एमएस धोनी सीएसकेसाठी सर्वाधिक (४६९९) धावा करणारा खेळाडू ठरला, यावेळी त्याने अष्टपैलू सुरेश रैनाला मागे टाकले.
तर कालच्या सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाने १९ चेंडूत २५ धावांची खेळी केली.
या खेळीसह तो आयपीएलमध्ये ३००० पेक्षा जास्त धावा आणि १०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला.