१२ लाख ते १८ कोटी! जडेजाला प्रत्येक IPL हंगामात किती मिळाली सॅलरी?

Pranali Kodre

चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय

आयपीएल २०२६ चे सर्वांनाच आता वेध लागले असून डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्याआधी पाचवेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने मोठा निर्णय घेतला.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

रवींद्र जडेजा ट्रेड

त्यांनी १२ हंगाम त्यांच्याकडून खेळणाऱ्या रवींद्र जडेजाला आणि सॅम करनला संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सला ट्रेड केले.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

१४ कोटींमध्ये ट्रेड

चेन्नईने सॅमसनला १८ कोटींमध्ये घेतलं असलं तरी जडेजाला ४ कोटी कमी करत १४ कोटींना ट्रेड केले. तसेच सॅमसनला २.४ कोटींमध्ये ट्रेड केले.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

४ कोटी कमी घेतल्याने आश्चर्य

जडेजाला आयपीएल २०२५ साठी चेन्नईने १८ कोटींना कायम केले होते, असे असतानाही जडेजा ४ कोटी कमी घेऊन राजस्थानमध्ये जाण्यास तयार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

जडेजाची आत्तापर्यंतची आयपीएल सॅलरी

जडेजाने २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सकडूनच आयपीएल कारकि‍र्दीची सुरुवात केली होती. त्यावेळी ते आयपीएल विजेतेपद जिंकला होता. तेव्हापासूनची जडेजाची आत्तापर्यंतची आयपीएल सॅलरी जाणून घेऊ.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

आयपीएलची सुरुवात...

जडेजाला २००८ आणि २००९ मध्ये राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी १२ लाख रुपये सॅलरी दिली होती. त्यानंतर २०१० मध्ये जडेजावर मुंबई इंडियन्ससोबत अनधिकृतपणे करार करण्याच्या प्रयत्नामुळे बंदी होती.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

आयपीएल २०११

२०११ आयपीएलमध्ये जडेजाला ४.३७ कोटी रुपयांना कोची टस्कर्स केरलाने संघात घेतलं होतं.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री

त्यानंतर २०१२ मध्ये जडेजा सर्वात महागडा खेळाडूंपैकी एक होता. त्याला त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सने ९.२० कोटी रुपयांना संघात घेतलं. याच किंमतीत तो २०१३ हंगामही खेळला.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

गुजरात लायन्सकडून खेळला...

चेन्नईने जडेजाला २०१४ आणि २०१५ हंगामांसाठी प्रत्येकी ५.५० कोटी रुपये दिले. त्यानंतर चेन्नईवर बंदी असताना २०१६ मध्ये जडेजा गुजरात लायन्सकडून ५.५० कोटींमध्ये, तर २०१७ मध्ये ९.५० कोटींमध्ये खेळला.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

चार हंगामांसाठी ७ कोटी

२०१८ साली जडेजाला चेन्नईने पुन्हा ७ कोटी रुपयांमध्ये संघात घेतलं. २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ या चार हंगामात जडेजाला प्रत्येकी ७ कोटी मिळाले.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

सॅलरी झाली दुप्पट

२०२२ आणि २०२३ हंगामांसाठी चेन्नईने जडेजाला प्रत्येकी १६ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर २०२५ साठी १८ कोटींना त्याला कायम केले होते.

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

धोनी की विराट, कोणता क्रिकेटर आवडतो? हरमनप्रीत कौरने दिलं उत्तर

Harmanpreet Kaur Reveals Her Favourite Cricketer

|

Sakal

येथे क्लिक करा