Aarti Badade
बीटरूट मध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. ते रक्तदाब नियंत्रणासाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कच्च्या बीटरूटमध्ये भरपूर फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व सी असते. हे पचनासाठी फायदेशीर आणि त्वचेसाठी चांगले मानले जाते.
उकडलेल्या बीटमध्ये पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखी महत्त्वाची खनिजे असतात, जी हृदयाचे आरोग्य आणि स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक आहे.
कच्च्या बीटमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात, तसेच त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर असतात.
उकडलेले बीट रक्तदाब कमी करण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे त्याचे फायदे वेगळे आहेत.
तज्ञांचे म्हणणे आहे की कच्च्या बीटमध्ये अधिक पोषक घटक आहेत, विशेषतः व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स, परंतु उकडलेले बीट योग्य पद्धतीने शिजवले तरीही आरोग्यदायी असू शकतात.
उकडलेल्या बीटला पोषक तत्व कमी होण्याची शक्यता असते, पण कमी पाणी आणि योग्य शिजवलेले बीट आरोग्यदायी ठरू शकतात.