कर्ज घेणार आहात? तर RBI चे 2025 मधील हे नवे नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे!

सकाळ डिजिटल टीम

कर्जदारांसाठी मोठी खुशखबर!

RBI ने 2025 साठी नवीन लोन नियम जाहीर केले. यात कर्ज प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि ग्राहकांना जास्तीचे अधिकार दिले आहेत.

Loan

|

Sakal 

सर्व कर्जांमध्ये मोठे बदल

पर्सनल, गोल्ड आणि सिल्वर लोनचे नियम बदलले. आता EMI, फी आणि व्याजदरांवर कर्जदारांना अधिक नियंत्रण मिळणार आहे.

Happy Customer

|

Sakal

आता ‘हिडन चार्जेस’ नाहीत

बँकांना लोन मंजुरीपूर्वी Key Fact Statement देणे बंधनकारक असून यात व्याजदर, एकूण खर्च आणि सर्व फी स्पष्टपणे लिहाव्या लागतील.

Loan no hidden Charges

|

Sakal

कर्जदारांसाठी EMI कमी

बँका आता व्याजदरातील ‘स्प्रेड’ लवकर बदलू शकतात. त्यामुळे व्याजदर कमी झाल्यास बँकांकडून ग्राहकांसाठी EMI देखील लवकर कमी केला जाईल.

Loan

|

Sakal

लोन लिमिट वाढवण्याचा नियम

तुमची संमती नसताना बँक लोन लिमिट वाढवू शकत नाही. 2 लाखांपेक्षा कामीचे लोन नाकारल्यास बँकेला लिखित कारण द्यावे लागेल. सोबतच मंजूर झालेले लोन थेट तुमच्या बँक खात्यातच जमा होणार.

loan limit

|

Sakal

आता चांदीवरही लोन मिळणार

RBI ने पहिल्यांदाच चांदीवर लोन घेण्यास परवानगी दिली. कर्जदारांना आता 10 किलो चांदी किंवा 500 ग्रॅम चांदीची नाणी गहाण ठेवून लोन मिळेल.

Silver Loan

|

Sakal

गोल्ड लोनचे नवे नियम

  1. 2.5 लाखपर्यंत सोन्यावर 85% कर्ज

  2. 2.5–5 लाख सोन्यावर 80% कर्ज

  3. तर 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर 75% कर्ज

  4. सोबतच आता प्रति ग्राहक 1 किलोपर्यंत सोनं गहाण ठेवता येईल.

LTV

|

Sakal

बुलेट लोन आणि व्हॅल्युएशनचे नियम कडक

गोल्डवरील बुलेट लोन ज्यात मूळ रक्कम आणि व्याज एकाचवेळी फेडले जाते ते 12 महिन्यांतच बंद करावे लागतील. तर सोने-चांदीचे मूल्य IBJA च्या दैनंदिन दरावर ठरेल.

Gold bullet loan

|

Sakal

कर्जदारांना अधिक अधिकार

RBI चे नवे नियमांमुळे कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल. त्यामुळे आता ग्राहकांना कर्जाच्या बाबतीत अधिक अधिकार मिळतील.

More Rights to Customer

|

Sakal

Gold Purity Test At Home

|

esakal

तुमच्याजवळचे सोने खरे आहे की खोटे? घरीच 'या' सोप्या पद्धतीने करा तपासणी