Vrushal Karmarkar
तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतीय चलनावर फक्त महात्मा गांधींचेच चित्र का आहे? भारतासारख्या देशात अनेक महान व्यक्ती आहेत. पण आजही नोटांवर फक्त बापूंचेच चित्र का छापले जाते?
तर या प्रश्नाचे उत्तर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच दिले आहे.याचा आरबीआयच्या कामकाजावर बनवलेल्या माहितीपटात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
आरबीआयची भूमिका आणि ती कशी कार्य करते हे पहिल्यांदाच माहितीपटाच्या स्वरूपात सादर केले गेले आहे. या माहितीपटाचे नाव 'आरबीआय अनलॉक्ड: बियॉन्ड द रुपी' आहे.
भारतीय चलनी नोटांवर प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे चित्र लावण्यासाठी रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा विचार करण्यात आला होता.
परंतु नंतर महात्मा गांधींच्या नावावर एकमत झाले. त्या एकमताचा परिणाम असा झाला की गांधीजींचे चित्र बऱ्याच काळापासून नोटांवर आहे.
रिझर्व्ह बँकेने पुढे म्हटलंय की, जर नोटेवर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे चित्र असेल तर ती नोट खरी आहे की बनावट हे ओळखणे सोपे होते.
कारण जर बनावट नोटांचे डिझाइन चांगले नसेल तर या चित्रांच्या मदतीने ती नोट खरी आहे की बनावट हे ओळखता येते.
महात्मा गांधींच्या १०० व्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर १९६९ रोजी पहिल्यांदा १०० रुपयांची स्मारक नोट जारी करण्यात आली होती. त्यावर सेवाग्राम आश्रमासह त्यांचे चित्र होते.
१९८७ पासून त्यांचे चित्र नियमितपणे रुपयावर दिसते. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये गांधीजींचे चित्र असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.
१९९६ मध्ये नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह महात्मा गांधींच्या नोटांची मालिका सुरू करण्यात आली.
ब्रिटिश राजवटीत नोटा कशा होत्या?