Vrushal Karmarkar
आरबीआय प्रिंटिंग प्रेसमधून देशाच्या कानाकोपऱ्यात पैसे पोहोचवण्यासाठी रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग यासारख्या वाहतूक व्यवस्थेचा वापर करते.
मात्र ब्रिटिश राजवटीत नोटा कशा होत्या? हे तुम्हाला माहिती आहे का? तर याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश काळात, भारतीय चलनांमध्ये वसाहतवाद आणि त्याच्याशी संबंधित ऐतिहासिक आणि राजकीय संदर्भ प्रतिबिंबित होत होते.
नोटांवर वनस्पती आणि प्राण्यांचे (वाघ, हरण) चित्र होते. ब्रिटिश साम्राज्याची भव्यता 'सजवलेल्या हत्ती' आणि रुपयावरील राजाच्या अलंकृत चित्रांद्वारे दर्शविली जात होती.
आरबीआयच्या मते, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा रुपयावर छापलेले चित्र देखील हळूहळू बदलू लागले.
सुरुवातीला अशोक स्तंभातील सिंहाचे चित्र, प्रसिद्ध ठिकाणे इत्यादी रूपयावर वापरले जात होते.
त्यानंतर हळूहळू, भारताच्या विकास आणि प्रगतीसह, रुपया या चित्रांद्वारे विकासाची कहाणी सांगू लागला.
जेव्हा देश विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत होता, तेव्हा आर्यभट्टांच्या कामगिरी आणि देशातील हरित क्रांती दर्शविण्यासाठी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे चित्र नोटांवर सुंदरपणे कोरले जात होते.
नोटांवर फक्त महात्मा गांधींचे चित्र का छापले जाते? अखेर कारण सांगत आरबीआयने दिले उत्तर