Pranali Kodre
बुधवारी (२२ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला.
या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, या सामन्यातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला मात्र मोठा धक्का बसला आहे.
आरसीबीने मोठी किंमत मोजून संघात घेतलेले इंग्लंडचे तिनेही फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले.
आरसीबीने आयपीएल २०२५ लिलावत फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकॉब बेथेल यांना कोट्यवधी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
सॉल्टसाठी ११.५० कोटी, लिव्हिंगस्टोनसाठी ८.७५ कोटी आणि बेथेलसाठी २.६० कोटी रुपये आरसीबीने खर्च केले आहेत. म्हणजेच या तिन्ही खेळाडूंसाठी आरसीबीने २२.८५ कोटी खर्च केले.
मात्र भारताविरूद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात सॉल्ट आणि लिव्हिंगस्टोन हे शून्यावर बाद झाले, तर बेथल ७ धावा करून परतला.
एकूणच तिन्ही फलंदाज लवकर बाद झाल्याने आरसीबीचं टेन्शन मात्र वाढलं आहे.