फाफ डू प्लेसिसचं विक्रमी अर्धशतक, गेलचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

प्रणाली कोद्रे

बेंगळुरूचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 4 विकेट्सने पराभूत केले.

Faf du Plessis - Virat Kohli | IPL | X/IPL

फाफ डू प्लेसिसचे अर्धशतक

या सामन्यात बेंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 23 चेंडूत 64 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले.

Faf du Plessis - Virat Kohli | IPL | X/IPL

18 चेंडूत अर्धशतक

त्याने ही खेळी करताना 18 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.

Faf du Plessis | IPL | X/IPL

पॉवर खेळी

विशेष म्हणजे तो या सामन्यात पॉवरप्लेच्या शेवटच्या म्हणजेच 6 व्या षटकात बाद झाला. म्हणजेच त्याने त्याची 64 धावांची खेळी पॉवरप्लेमध्येच पूर्ण केली. त्यामुळे त्याने काही विक्रम केले आहेत.

Faf du Plessis | IPL | X/IPL

दुसरे वेगवान अर्धशतक

फाफ डू प्लेसिस बेंगळुरूकडून आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.

Faf du Plessis - Virat Kohli | IPL | X/RCBTweets

अव्वल क्रमांक

या यादीत ख्रिस गेल अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 2013 साली पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक केले होते.

Chris Gayle | X/RCBTweets

गेलचा विक्रम मोडला

इतकेच नाही, तर फाफ बेंगळुरूकडून पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाजी बनला आहे. याबाबतही त्याने ख्रिस गेलला मागे टाकले आहे.

Faf du Plessis | IPL | X/IPL

ख्रिस गेल

गेलने तीनवेळा पॉवरप्लेमध्ये 50 धावा केल्या आहेत. त्याने 2012 आणि 2013 साली पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्धच्या सामन्यात आणि 2015 साली पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात असा विक्रम केला आहे.

Chris Gayle

रोहितला मुंबई इंडियन्सने 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून का खेळवले?

Rohit Sharma | X/MIPaltan