रोहितला मुंबई इंडियन्सने 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून का खेळवले?

प्रणाली कोद्रे

केकेआरचा विजय

आयपीएल 2024 मध्ये 3 मे रोजी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 24 धावांनी विजय मिळवला होता.

KKR | X/KKRiders

रोहित नव्हता प्लेइंग-11 चा भाग

दरम्यान, या सामन्यात टॉस जिंकून मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहितचा समावेश नव्हता, त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले.

Rohit Sharma | X/MIPaltan

इम्पॅक्ट प्लेअर

मात्र, नंतर दुसर्‍या डावात रोहित सलामीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला उतरला. पण तो 11 धावा करून बाद झाला.

Rohit Sharma | X/IPL

पहिलीच वेळ

रोहित शर्मा आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.

Rohit Sharma | X/IPL

का?

दरम्यान, तो या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का खेळला, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

Rohit Sharma | X/MIPaltan

पीयुष चावलाकडून खुलासा

यामागील कारणाचा खुलासा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पीयूष चावलाने केला.

Rohit Sharma | X/MIPaltan

कारण

चावलाने सांगितले की सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या पाठीत थोडे दुखत होते, त्यामुळे व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला क्षेत्ररक्षणासाठी उतरवले नाही.

Rohit Sharma | X/IPL

IPL : विराट, रोहितला संदीप शर्मा जातोय जड, 'इतक्यांदा' केलंय आऊट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Sharma | IPL | Sakal